Summer skin care tips you must follow this season हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत आहे. वातावरण बदलत आहे. या बदललेल्या वातावरणात त्वचेची देखभाल करणे आवश्यक आहे.
थोडं पण कामाचं
- उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी
- त्वचा नैसर्गिकरित्या मॉयश्चराइज करा
- सनस्क्रीनचा नियमित वापर करा
मुंबईः हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत आहे. वातावरण बदलत आहे. या बदललेल्या वातावरणात त्वचेची देखभाल करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात लोकरीचे कपडे, शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचे सेवन, स्कीन केअर लोशन, तेलाचे मालीश या पद्धतीने त्वचेची काळजी घेतली जाते. आता स्कार्फ, सुती कपडे, उन्हापासून संरक्षण करणारी डोक्यावरची टोपी अथवा छत्री यांचा वापर वाढणार आहे. (Summer skin care tips you must follow this season)
उन्हाळ्यासाठी केवळ पोशाख बदलून चालणार नाही तर त्वचा देखभालीकरिता दिनचर्या देखील बदलणे तितकेच गरजेचे आहे. हिवाळ्यात त्वचेची देखभाल घेण्याची पध्दत आणि उन्हाळ्यात त्वचेची देखभाल करण्याची पद्धत भिन्न आहे. निरोगी चमकदार त्वचा राहावी तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि मुरुमे कमी व्हावीत यासाठी अगदी सहज सोपे असे उपाय उपलब्ध आहेत. फक्त हे उपाय नियमित व्यवस्थित करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेची निगा राखली जाईल.
उन्हाळ्यात त्वचा काळवंडणे, मुरुमांची समस्या निर्माण होणे, उन्हाचा त्रास होऊन त्वचेवर लालसर पुरळ उठणे अशा अनेक समस्या निर्माण होतात. या अशा समस्या सोडवण्यासाठी त्वचेची काळजी घ्या. त्वचेची देखभाल करण्याच्या पद्धतीत थोडा बदल करा. या बदलांमुळे नव्या हवामानाशी जुळवून घेणे त्वचेसाठी सोपे होईल.
फोमिंग क्लीन्झर्सचा वापर करा. त्वचा कोरडी होऊ न देता त्वचेच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. कोरफड, काकडी, चारकोल क्लीन्झरचा वापर करा.
चांगल्या दर्जाच्या व्हिटॅमिन सी सीरमचा वापर करा जे आपल्या त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. त्वचेला संतुलित ठेवण्यात मदत करतात. त्वचेसाठी आपण कॉफी सीरमची निवड देखील करू शकता. जर तुमची त्वचा नाजूक असेल आणि मुरुमांची समस्या असे तरे मॉयश्चराइझ करण्यापूर्वी कोजिक अॅसिडचा समावेश असलेले सीरम वापरू शकता.
त्वचा नैसर्गिकरित्या मॉयश्चराइज करा
उन्हाळ्यातील मॉइश्चरायझिंग ही त्वचेवरील चमक, आर्द्रता आणि मुरुमांपासून मुक्त करण्यास मदत करते. त्वचेमधील ओलावा कायम राखण्यासाठी सौम्य मॉयश्चरायझर्सची निवड करा. हायल्यूरॉनिक अॅसिडचा समावेश असलेल्या मॉयश्चरायझर्सचा वापर करा.
सनस्क्रीनचा नियमित वापर करा
निरोगी त्वचेकरिता सनस्क्रीनचा वापर करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. उन्हाळ्याच्या वेळी एसपीएफ ५० पीए+++ सनस्क्रीनचा वापर करा. दर तीन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावा. सनस्क्रीनशिवाय बाहेर पडणे टाळा. सनस्क्रीनचा वापर हा अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करेल.
रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घ्या
रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या रात्रीच्या दिनचर्येत रेटिनॉइड्स समाविष्ट करा. ते आपल्या त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करेल तसेच मुरुमांपासून बचाव करेल. रेटिनॉल आधारित मॉयश्चरायझर किंवा सीरम वापरा.
त्वचेवरील मृत पेशी काढण्याचे उपाय
त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एक्सफोलिएशन (Exfoliation) आणि स्टीम (steam) देऊ शकता. आठवड्यातून दोनदा सौम्य एक्फोलीएटर वापरा आणि आपल्या त्वचेला चमक कशी प्राप्त होते ते पहा. एक्सफोलिएशन छिद्रांना अनलॉक करेल आणि त्वचेच्या सर्व मृत पेशीपासून मुक्त होईल. उन्हाळ्यात आपल्या पर्समध्ये हे नक्कीच असू द्या. फेशियल मिस्ट स्प्रे जवळ ठेवा. घाम आलेल्या त्वचेवर फवारा. आपल्या बॅगमध्ये सनस्क्रीन आणि मॉयश्चरायझर ठेवा.
डोळ्यांभोवती त्वचा विशेषतः अधिक संवेदनशील असते. त्या त्वचेचे संरक्षण करा आणि उन्हात बाहेर पडताना नेहमी सनग्लासेस घाला. ओठांसाठी एसपीएफ असलेले लिप बाम वापरा. काही तासांनी हे लिप बाम पुन्हा लावा. आणि ओठ कोरडे वाटल्यास कधीही चाटू नका.
हाताची आणि पायांची नियमित देखभाल करा. दर महिन्याला मेनिक्युअर आणि पेडीक्युअर करा.
जर आपल्या त्वचेला खाज सुटण्याचा त्रास होत असेल त्वचाविकार तज्ञांचा सल्ला घ्या. हलके आणि सुती कपडे घाला. आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा. उन्हाळ्यासाठी आपल्या त्वचेची देखभाल नियमित करण्यामध्ये मेसोथेरपी एक चांगला उपचार आहे. मेसोथेरपीमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि पेप्टाइड्स यांचे मिश्रण वापरले जाते जे त्वचेला आतून संरक्षण करण्यास मदत करते. याकरिता आपल्या त्वचारोगतज्ज्ञाशी संवाद साधा; अशी माहिती अॅस्थेटिक क्लिनिकच्या त्वचाविकार तज्ज्ञ आणि कॉस्मॅटिक सर्जन डॉ. रिंकी कपूर यांनी दिली.