Itchy Scalp In The Summer Of The Skin Is Annoying, Make Treatment
उन्हाळ्यात डोक्याच्या त्वचेवरील खाज (Itchy Scalp) ठरतेय त्रासदायक, करा उपचार

तुम्ही तुमच्या मित्रांसोबत असताना किंवा तुमच्या वरिष्ठांसोबत असताना डोक्याला खाज सुटली तर अवघड परिस्थिती होते आणि तुमच्या नकळत तुमचा हात डोके खाजविण्यासाठी गेला तर अजूनच खजील झाल्यासारखे होते. डोक्याला कंड येत असेल तर खूप अस्वस्थ वाटते. सध्याचा उन्हाळा पाहता आणि तुम्हाला खूप घाम येत असेल तर डोक्याला कंड सुटण्याचे प्रमाण वाढते. खाजऱ्या स्काल्पमध्ये घामामुळे भर पडते आणि कंड अधिक तीव्र होते. पण यावर नक्की उपाय काय आहेत. POPxo मराठीने द एस्थेटिक क्लिनिक्सच्या कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो सर्जन डॉ. रिंकी कपूर यांच्याकडून याची कारणं आणि उपाय जाणून घेतले. कुणालाही डोक्यात कंड आलेली आवडत नाही पण अनेक कारणांमुळे असे होऊ शकते.

 

scalp 1

 

1. संवेदनशील स्काल्प: नैसर्गिकरित्या तुमची स्काल्प संवेदनशील असेल तर ती घट्ट आणि खाजरी वाटू शकते. चुकीचा आहार किंवा चुकीचा शॅम्पू वापरल्याने ही संवेदनशील होऊ सकते. यावर उपाययोजना करण्यासाठी तुम्हाला या संवेदनशीलतेचे कारण शोधून काढून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. त्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टची भेट घेणं. अति उन्हाळा किंवा हिवाळा. खूप वारा किंवा ऊन असेल तरीही तुमची स्काल्प कोरडी आणि खाजरी होऊ शकते.

 

2. कोरडी स्काल्प: हायड्रेशनचा अभाव, तीव्र शॅम्पूंचा अति वापर, अँटि डॅण्ड्रफ शॅम्पू, स्मूथनिंग, आयर्निंगसारख्या रासायनिक प्रक्रियांचे अति प्रमाण, केस ब्लो ड्रायिंगने वाळवणे, तीव्र रंगांचा वापर करणे इत्यादी कारणांमुळे स्काल्प कोरडी होते.

 

3. जेल, वॅक्स, फिक्सर्स इत्यादी स्काल्प कॉस्मेटिक्स चुकीच्या पद्धतीने काढणे

 

4. मानसिक ताण: शारीरिक आणि मानसिक ताणामुळे पुळ्या येतात. परिणामी खाज सुटते. शिवाय स्काल्पला झालेली इजादेखील याचं एक महत्त्वाचं कारण आहे.

 

5. गरोदरपणा, मासिक पाळी, स्टेरॉइड्स आणि रजोनिवृत्तीनंतर होणारे हॉर्मोन्समधील बदल हेदेखील एक कारण आहे

 

6. पदार्थांबद्दल असलेली अॅलर्जी

 

7. कोंडा/सिबोऱ्हिक अॅक्झेमा: कोंडा नक्की कशामुळे होतो हे खरे तर कुणालाच माहीत नाही, पण स्काल्प खाजरी होण्यासाठी हे मुख्य कारण आहे. कोंड्यामुळे तुमची स्काल्प खाजरी होतेच, त्याचप्रमाणे केसांतून पडणारे पांढऱ्या रंगाचे कणदेखील त्रासदायक ठरतात

 

8. सोरायसिस: हा एक ऑटोइम्युन आजार आहे आणि त्यावर ताबडतोब उपचार करण्याची आवश्यकता असते. याचे सर्रास आढळणारे लक्षण म्हणजे तुम्हाला एकाच जागी कंड येते

 

9. फंगल इन्फेक्शन – स्काल्पला होणारे टिनिया फंगल इन्फेक्शन्स हेदेखील एक कारण आहे

10. उन्हामुळे उठणारे पुरळ – हे कंड येण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. अधिक काळ उन्हात राहिल्यास पुरळ उठते

 

11. कॉन्टॅक्ट डरमॅटिटीस: स्काल्प असहनीय घटकाच्या संपर्कात आल्यामुळे ही परिस्थिती उद्भवते.

 

डोक्याला खाज जेण्याकडे दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे खालील परिणाम होऊ शकतात

 

12. स्काल्पवर चीर: जेव्हा तुम्ही स्काल्प खाजवता तेव्हा काही काळाने स्काल्पवर जखम होते. यामुळेदेखील खाज येते. तर याचबरोबर केसगळती हेदेखील एक कारण आहे.

 

13. त्वचेचा कर्करोग: हे अत्यंत टोकाच्या प्रकरणात उद्भवते पण तुमची त्वचेला पटकन अॅलर्जी होत असेल आणि अतिसंवेदनशील असेल तर तुम्ही अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

 

काय करावा उपचार?

 

scalp FI

 

खाजऱ्या स्काल्पवर उपाय करण्यासाठी खाजरेपण मूळ धरण्याआधी आणि पसरण्याआधी खाजरेपण घालवून टाकणे हाच उपाय आहे. तुम्ही तुमच्या स्काल्पची आणि केसांची काळजी घेतली तर तुम्ही अधिक नुकसान होण्यापासून वाचवू शकता. तुम्ही सोप्या गोष्टी करून हे साध्य करू शकता:

· उन्हाळ्यात फार मसालेदार आहार घेऊ नका. मसालेदार पदार्थांमुळे ग्रंथी उद्दीपित होतात आणि तुमच्या केसांमध्ये अधिक घाम येऊ शकतो,ज्यामुळे उन्हाळ्यात कंड येण्याची समस्या वाढेल.

· खाजवू नका – हे कठीण आहे ते आम्हाला माहीत आहे, पण जेव्हा कंड येईल तेव्हा खाजवू नका, कारण त्यामुळे समस्या अधिक गंभीर होईल. कंड शमविणारी उत्पादने म्हणजेच कोरफडयुक्त उत्पादने तुमच्या स्काल्पला लावा. त्याचप्रमाणे शॅम्पू केल्यानंतर तुमच्या केसांना पांढरे व्हिनेगार लावून केस धुवू शकता. त्यामुळे आश्चर्यकारक परिणाम पाहायला मिळतील.

·  चांगला अँटि-डँड्रफ शॅम्पू वापरा: अँटि-डँड्रफ शॅम्पूमध्ये थंड करणारे आणि बरे करणारे मेन्थॉल व झिंक ऑक्साइडसारखे घटक असतात. त्यामुळे स्काल्पला थंडावा मिळतो आणि कंड येण्याला प्रतिबंध होतो आणि लवकर बरे होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे या समस्येवर दुकानात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. तुमच्या स्काल्पला सुयोग्य असलेला अँटि-डँड्रफ शॅम्पू सुचविण्यास तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टला सांगा.

·  तुमच्या केसांमधील मॉईश्चरायझर परत आणा: जेल आणि सेरमसारखी केस मॉइश्चराईज करणारी उत्पादने वापरा. या उत्पादनांमुळे तुमची स्काल्प उन्हाळ्यातही थंड व मॉइश्चराईज राहतील.

·  सूर्यकिरणांपासून संरक्षण करणारी उत्पादने वापरा: तुमच्या स्काल्पला सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचविणे हे तुमेच उद्दिष्ट असावे. कारण या किरणांमुळे कंड येते. म्हणून सूर्यकिरणांपासून रक्षण करणारी उत्पादने वापरणे इष्ट ठरेल. तुम्ही सनस्क्रीन केसांमध्ये वापरू शकत नाही, हे आम्हाला माहीत आहे आणि यूव्ही किरणे तुमच्या केसांना आणि स्काल्पला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे यूव्ही प्रोटेक्शन स्प्रेचा वापर करा. हे स्प्रे केसांचे संरक्षण करतात आणि ते मलूल, मेणचट किंवा तेलकट दिसत नाहीत.

· बाहेर जाताना टोपी किंवा स्कार्फ घाला: त्यामुळे सूर्यकिरणे थेट तुमच्या स्काल्पपर्यंत पोहोचणार नाहीत.

· हायड्रेट: उन्हाळ्यात खूप पाणी प्या, विशेषत: तुम्ही बराच वेळ बाहेर असाल तर पाणी प्यायलेच पाहिजे. त्यामुळे तुमची त्वचा आतून थंड राहील.

· कोमट पाण्याने अंघोळ करा: अति गरम किंवा अति थंड पाण्याने अंघोळ केल्यास कंड वाढते. जर आधीच नुकसान झाले असेल तर ‘आफ्टर द सन शॅम्पू’ वापरा.

· दर दिवसाआड शॅम्पू: दर दुसऱ्या दिवशी केसांना शॅम्पू लावा आणि तुमची स्काल्प खूप तेलकट असेल तर उन्हाळ्यात रोज शॅम्पू लावा. त्यामुळे तुमच्या तुमच्या स्काल्पवर तेल व घाम साचणार नाही आणि तुमची स्काल्प आणि केस स्वच्छ राहतील.

· एवढे करूनही कंड कायम राहिली आणि वाढत गेली तर लगेच तुमच्या डर्मेटॉलॉजिस्टकडे जा आणि वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरण करा.

Article Source – https://marathi.popxo.com/2019/05/reason-and-treatment-for-itchy-scalp-in-marathi/

 


Our Clinics

The Esthetic Clinic :
Shop no.4, Shraddha building no.3, Thakur complex, Kandivali East, Mumbai.

The Esthetic Clinic:
SL Raheja hospital (A Fortis Associate) Raheja Rugnalaya Marg, Mahim west, Mumbai 400016

Phone: +91 9004671379
Mon - Sat from 11 AM to 8 PM
Email: drrinkykapoor@gmail.com

Websites:
www.theestheticclinic.com www.skindoctorindia.com www.cosmeticdermatologistindia.com www.dermatologistmumbai.com www.laserskinexpert.com

Expertise In

• Skin diseases
• Sexually transmitted diseases
• Hair disorders
• Nail disorders
• Cosmetic skin treatments
• Skin surgeries
• Laser skin treatments

Find us on facebook

Get In Touch
close slider