नैसर्गिकरित्या सौंदर्य खुलविण्यासाठी खास टिप्स
आपल्या त्वचेचे सौंदर्य खुलविण्यासाठी आपण बऱ्याच सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो. त्याशिवाय निरोगी जीवनशैली आणि पोषक आहाराचे सेवन केल्यास नक्कीच नैसगर्गीकित्या सौंदर्य खुलविता येते. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे घरबसल्या आपल्या त्वचेवर लावण्यात येणारी रासायनिक उत्पादने, प्रखर सूर्यापासून बचाव करण्यासाठी वापरली जाणारी उत्पादने तसेच मेकअपचा वापर टाळला जात असून आपली त्वचा मोकळा श्वास घेत आहे. बाहेरील उत्पादनांचा वापर केला जात नसून त्वचा नैसर्गिकरित्यादेखील स्वच्छ आणि सुंदर राहू शकते याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे नियमित याचा कसा वापर करून घ्यायचा याबद्दल ‘POPxo मराठी’ला माहिती दिली आहे, द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ, डॉ रिंकी कपूर यांनी. जाणून घेऊया काय आहे सौंदर्य खुलविण्यासाठी नैसर्गिक वापराच्या खास टिप्स.
शांत झोप
जर आपण पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे लगेचच आपल्या त्वचेवर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. डोळ्याखाली काळी वर्तुळे, सुरकुत्या आणि थकवा दिसून येतो. दररोज रात्री किमान 7 तास झोप घेणे गरजेचे आहे. तसंच दुपारी तुम्हाला वेळ मिळाला आणि रात्री झोप पूर्ण झाली नसेल तर काही वेळ तुम्ही किमान अर्धा तास दुपारी झोप घ्यावी. जेणेकरून तुमची त्वचा अधिक तजेलदार राहण्यास मदत मिळते.
त्वचेची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक घटकांनीयुक्त निस्सी स्किन केअर
नियमित व्यायामाच्या सवयी लावा
आठवड्यातून तीन वेळा 45 मिनिटे व्यायाम केल्यास आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहील. व्यायामाचा एक नित्यक्रम आखून त्यानुसार न चूकता व्यायाम करा. आपल्याला लवकरच फरक दिसेल. घरात बसून सतत बसून काम करत असाल अथवा ऑफिसलाही सतत बसून राहात असाल तर शरीराला व्यायामाची गरज असते, अन्यथा त्वचा अधिक निस्तेज दिसते. त्यामुळे ही सवय लाऊन घ्या.
सूर्यापासून त्वचेचे संरक्षण करा
सूर्याच्या उष्णतेचा आपल्या त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवा. बाहेर जाताना टोपी घाला. अतिनील किरण त्वचेचे नुकसान करतात. त्यामुळे त्वचा काळवंडणे, त्वचा निस्तेज होणे, काळे चट्टे अशा समस्या दिसून येतात. आपल्याला शक्य तितके स्वतःचे रक्षण करा. तसेच नियमित सनस्क्रिन लावा आणि त्वचेची काळजी घ्या
हायड्रेट रहा
ठराविक अंतराने पाणी प्यायलाने त्वचा व्यवस्थित हायड्रेड राहते. त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी हा सोपा उपाय आहे. आपल्या आहारात काकडी, टोमॅटो, कोबी, द्राक्षे आणि टरबूज यासारखे पदार्थ समाविष्ट करा कारण यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्वचेची आर्द्रता योग्य राखल्यास त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते. तसेच चेहऱ्यासाठी आणि नियमित सॅनिटाईज राहण्यासाठी MyGlamm च्या वाईपआऊटचाही वापर तुम्ही करून घेऊ शकता.
तणावापासून दूर रहा
ताणामुळे कॉर्टिसॉल हार्मोनचे जास्त प्रमाणात उत्पादन होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते, सुरकुत्या येतात. तणावमुक्त राहण्यासाठी स्वतःसाठी वेळ द्या आणि पुरेसा आराम करा.
त्वचेकरिता खास टिप्स
मीठ, साखर, मध आणि नारळ तेल यांचे मिश्रण तयार करा. आठवड्यातून दोनदा मृत त्वचा (डेड स्किन) काढून टाकणे आवश्यक आहे
काही द्राक्षे घ्या आणि ती अर्धी कापून घ्या आणि आपल्या त्वचेवर चोळा. जेणेकरून त्वचा स्वच्छ होईल. द्राक्षाचा त्वचेसाठी चांगला उपयोग होतो
आयक्रिम वापरण्यापूर्वी फ्रिजमध्ये ठेवा. त्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होईल
चेह-यावरील छिद्रे बंद करण्यासाठी फेस मास्कचा वापर करा. पपईचा मास्क वापरा. यामुळे त्वचेला जास्त चांगल्या प्रमाणात फायदा मिळतो
सूर्यापासून संरक्षण करणारे मॉईश्चरायझर वापरा
रिकाम्या स्प्रे बॉटलमध्ये 1 चमचा सी सॉल्ट 200 मिली पाण्यात मिसळा आणि त्यात लव्हेंडर तेलाचे 8 थेंब घाला. ओलसर केसांवर चांगले हे फवारा जेणेकरून केसांमधील कोरडेपणा दूर होईल.
आपल्या केसांना रासायनिक उत्पादनांचा वापर करू नका. सहसा केसांवर असा वापर करणे टाळा
अर्धा कप मेयो घ्या आणि ओल्या केसांवरील टिप्स मुळापासून पसरवा. 15 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा आणि सामान्य प्रमाणे शँपू लाऊन केस धुवा. तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल
Article Source – https://marathi.popxo.com/2020/09/how-to-glow-skin-naturally-special-tips-in-marathi/