तुम्हालाही व्हेलेंटाईन डे साठी सुंदर दिसायचं असेल तर वापरा सोप्या टिप्स
व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसमोर आपले प्रेम व्यक्त करताना आपले व्यक्तीमत्त्व देखील तितकेच खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी आम्ही डॉ रिंकी कपूर, द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या त्वचारोग सल्लागार आणि कॉस्मेटिक त्वचारोग तज्ज्ञ यांचा सल्ला घेतला. त्यांनी आम्हाला काही महत्वाच्या टिप्स दिल्या ज्या आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. तुम्हीही या टिप्स वापरून तुमचा व्हॅलेंटाईन डे करा यावर्षी खास. तुम्हालाही दिसायचं असेल अधिक खुलून तर या सोप्या टिप्स नक्की फॉलो करा आणि पाहा स्वतःमधील बदल.
कसे दिसाल अधिक सुंदर – सोप्या टिप्स
- दररोज सकाळी आणि रात्री त्वचा स्वच्छ करा: हिवाळ्यातही त्वचा स्वच्छ करण्यास टाळाटाळ करू नका. त्वचा उजळ दिसण्यासाठी तसेच त्वचेवरील चमक कायम ठेवण्यासाठी हा उपाय नक्कीच फायदेशीर ठरतो.
- त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी ती आठवड्यातून एकदा स्क्रब करा.
- मेकअपपूर्वी मॉइश्चरायझरचा वापर करा : हे त्वचा उजळ दिसेल तसेच त्वचेवरील ओलावा कायम राखता येईल. व्हॅलेंटाईन डे असतो खास. त्यामुळे प्रपोझ करणार असाल तर नक्की याचा वापर कर
- गुलाब पाण्याचा वापर करा – दिवसातून दोनदा गुलाब पाण्याचा वापर करा. जेव्हा आपल्याला त्वचा कोरडी वाटत असेल तेव्हा गुलाब पाण्याचा वापर करा. गुलाब पाणी त्वचेच्या पेशींना हायड्रेट करण्यास मदत करते.
- आपल्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या: आपले त्वचाविकार तज्ज्ञ त्वचेच्या सौंदर्यासाठी काही उपचार सुचवू शकतात
- बोटॉक्सचा देखील सर्वात प्रभावी परिणाम पहायला मिळतो. चेहर्याचा क्रीम त्याच्या प्रभावासाठी प्रतीक्षा का करावी? बोटॉक्स उपचार अवघ्या 3 ते 5 दिवसात तुम्ही परिणाम पाहू शकता आणि पुढील सहा महिने याचा प्रभाव दिसून येतो.
- डर्मल फिलरचा वापर करून आपल्या ओठांचे सौंदर्य वाढवा. जेव्हा सेल्फी घ्याल किंवा पाऊट कराल तेव्हा तुमच्या ओठांचे सौंदर्य आणखी खुलून दिसेल. फिलरचा पूर्ण प्रभाव दिसून येण्यासाठी केवळ 1-2 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो.
त्वचा ठेवा अधिक चांगली
- सीओ 2 लेसर त्वचेचा उपचाराने त्वचेची मृत पेशी काढून टाकता येतात, त्वचा घट्ट होऊ शकते, टॅन काढून टाकू शकते, रंगद्रव्य कमी होऊ शकते आणि त्वचेवरील डाग देखील कमी होऊ शकतात. आपण याचा परिणाम फक्त 4-5 दिवसात पाहू शकता.
- आपल्या त्वचेवरील अथवा गळ्याभोवती असलेल्या सुरकुत्या नको आहेत तर एफडीएने मंजूर केलेला अल्ट्रासाऊंड उपचार पद्धतीचा वापर करू शकता. याचा परिणाम म्हणजे त्वचा घट्ट करणे आणि मान, हनुवटी जवळील भागाच्या सुरकुत्या होतील.
- आपण नियमित व्यायाम करत असलात तरी, काही वेळेस अनावश्यक चरबी साठून राहते. कूलस्लप्टिंग या पर्यायाने त्वचेखालील चरबीच्या पेशींना लक्ष्य करते आणि त्यांना गोठवून त्यांचा नाश करते
- नको असलेले केस लेसर उपचार पद्धतीने काढून टाकता येतात. या उपचारास फक्त 30 मिनिटे लागतील आणि याचा परिणाम आपल्याला वर्षभरासाठी पहायला मिळेल. पूर्ण केस काढून टाकण्यासाठी यासाठी एकाधिक सत्रांची आवश्यकता आहे.
- आपल्या हाताच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष द्या. कदाचित या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तींकडून प्रपोज देखील केले जाऊ शकते. नखांवर चांगले मॅनिक्युअर करून नखं रंगविण्यास विसरू नका.
- हानिकारक अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी दररोज 3 तासांनी एक चांगले सनस्क्रीन लावण्यास विसरू नका. योग्य आणि संतुलित आहाराचे सेवन करा.
- व्हॅलेंटाईन डे साजरा करताना अर्थातच बजेटही ठरवावं लागतं. त्या बजेटमध्ये सर्वात पहिले सुंदर दिसणं हे महत्त्वाचं आहे, नाही का?