लहान मुलांची हेअर स्टाइल करा पण जपून नाहीतर…
लहान मुलगी असली की तिची पोनी बांधणे, हेअरबँड लावणं, वेगवेगळ्या प्रकारचे क्लिप्स लावणं यामुळे ती चिमुकली अधिकच गोड दिसते. लहान मुलींना अशा हेअरस्टाइल (child hairstyle) चांगल्या वाटत असल्या तरी त्यामुळे किंवा त्यासाठी वापरलेल्या एक्सेसिरीजमुळे त्यांच्या केसांना हानी पोहोचू शकते. त्यामुळे लहान मुलांची अशी हेअरस्टाइल करताना पालकांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे.
लहान मुलांचे केस घट्ट बांधल्याने किंवा त्यांच्या केसांना घट्ट अशा एक्सेसिरीज लावल्याने त्यांच्या स्कॅल्पवर म्हणजे डोक्याच्या त्वचेवर परिणाम होतो आणि त्यांना समस्या उद्भवू शकते.
मुंबईतील कन्सलटंट आणि कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितलं, “हेअरबँड, वेणी, बो बांधून लहान मुलं खूप क्यूट दिसतात. पण जर मुलांच्या केसांना लावलेल्या हेअर एक्सेसरीज घट्ट असतील किंवा त्यांचे केस घट्ट बांधले असतील. तर यामुळे त्यांच्या डोक्याच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. मुलांना ट्रॅक्शन अॅलोपेसिया (traction alopecia) होऊ शकतो आणि त्यांचे केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात”
“रबरने घट्ट केस बांधल्याने किंवा घट्ट क्लिप लावल्याने केस तुटतात आणि याचा नियमित वापर करत असाल तर त्या जागेवरील केसांची वाढ थांबेल”, असंही त्यांनी सांगितलं.
लहान मुलांचे केस बांधताना काय काळजी घ्याल?
जर मुलांचे केस गळत आहेत असं दिसलं तर हेअर एक्सेसरीज वापरणं थांबवा. केस पुन्हा वाढ होण्यासाठी आणि हेअर फॉलिकल पुन्हा हेल्दी होण्यासाठी थोडा वेळ द्या.
केस जोरात खेचू नका. यामुळे केस तुटतात.
नरम दात असलेल्या फणीने केस विंचरा.
दररोज एकाच पद्धतीने केस बांधू नका. एक दिवस उजव्या बाजूला पोनी, एक दिवस डाव्या बाजूला पोनी, कधीतरी केस मोकळे ठेवा.
ग्लिटर, स्टोन असलेल्या एक्सेसरीज वापरू नको. या एक्सेसरीज लहान मुलांच्या हातात आल्यास ते गिळू शकतात.
मूल झोपताना त्यांच्या केसांना लावलेल्या एक्सेसरीज काढून टाका.
Article Source – https://lokmat.news18.com/lifestyle/do-not-tied-child-hair-with-tight-accessories-cause-child-hair-issue-mhpl-485439.html